सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- राज्यातील 23 हजार तरूणांना मिळणार रोजगार - या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात 34 हजार 850 कोटींच्या उद्योगांची उभारणी करण्यात येणार असून त्यामुळे 23 हजार तरूणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
सोमवारी या सांमजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे. राज्यात एक लाख कोटी गुंतवणूक करण्याचे लक्ष पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगितले आहे.
लाॅकडाऊनच्या सुरूवातीला सरकारने सोळा हजार कोटींच्या गुंतवणूकीचे करार केले होते, त्यातील 60 उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या या कार्यक्रमात उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी.अनबलगण, आणी गुंतवणूकदार सहभागी झाले होते.


No comments:
Post a Comment