Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/अमीर आतार- पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे पाठीमागे घेण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मागणी.


*पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे पाठीमागे घेण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मागणी*
सोलापूर -जगात कोरोना या महामारी ने थैमान घातले असून त्याचे मोठया प्रमाणात पडसाद देशात राज्यात व सोलापूर शहर व जिल्ह्यात उमटले असून केंद्र सरकार राज्य सरकार पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन कोरोना रोगाला अटकाव करण्यासाठी संचार बंदी जमाव बंदी सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करत असून याच बरोबर प्रशासन च्या खांद्याला खांदा लावून शहरातील पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला ठेवून व आपला जीव धोक्यात घालून जीवाची बाजी लावून राज्य सरकार केंद्र सरकार पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व महापालिका प्रशासन चे जनतेला केलेले आदेश निर्देश सूचना बाबत सोलापूर शहरातील काही पत्रकार वार्तांकन करत असताना काही पत्रकारांच्या पोलिसांनी मोटारसायकली जप्त करून कलम 188 प्रमाणे अटक करून पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल केले आहे यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगर वस्ती, जेलरोड, एम आय डी सी, व सदर बाझार पोलीस ठाण्यात अनेक पत्रकारांवर संचार बंदी काळात गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरची घटना लोकशाही ला मारक असून कोरोना रोगाबाबत जनजागृती करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याने या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती ने निषेध व्यक्त केला असून संचार बंदी काळात पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ पाठीमागे घेण्यात यावेत म्हूणन पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून तात्काळ गुन्हे पाठीमागे नाही घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे 
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सल्लागार संतोष कुलकर्णी वकील शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार उपाध्यक्ष प्रभाकर एडके बिपीन दिड्डी, अशोक माचण उमेश नीलि, पद्मिनी येळणे, आन्सर तांबोळी, इम्रान सगरी, अभिषेक चिल्का, इम्तियाज अक्कलकोटकर, विश्व्जीत कारंडे, हरीश पवार, दिगंबर इप्पलपल्ली, महंमद इंडिकर, रियाज शेख, लक्ष्मण गणपा, विष्णू सुरवसे, शिवयोगी निंबाने, भास्कर अल्ली, अक्षय बबलाद, प्रसाद ठक्का, अमर पवार, ज्ञानेश्वर गवळी, सतीश गडकरी, इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment