Breaking

Wednesday, 7 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- फायनान्स, बॅंक, वित्तीय संस्थेचे कर्ज माफ करावे यासाठी शिवसेना बार्शी शहर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- फायनान्स, बॅंक, वित्तीय संस्थेचे कर्ज माफ करावे यासाठी शिवसेना बार्शी शहर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा- याबाबत सविस्तर वृत्त असे की 

महिला भगिनींनी  घेतलेलं बँक, फायनान्स, वित्तीय संस्था यांचे सर्व प्रकारचे कर्ज आणि व्याज माफ करावं या मागणीसाठी शिवसेना बार्शी शहर यांच्या वतीने येत्या 13 ऑक्टोबर रोजी सोलापुरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब आंधळकर यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
 ते म्हणाले ,कोरोना काळात सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले. शासनानं प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लॉकडाउन जाहीर केला होता. यामुळे शेतकरी उद्योजक याच बरोबर बचत महिला गटातील महिला त्यांचे उद्योगही अडचणीत आले . बार्शी मध्ये सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीने आपण जून महिन्यात  मायक्रो फायनान्स किंवा फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल आवाज उठवला. बजाज फायनान्स जनशक्ती इक्विटी या कार्यालयाची  नागरिकांनी तोडफोड केली. आमच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. यानंतर बचत गटा कडील कर्ज वसुली करू नये असे शासनाने आदेश काढले. न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महिलांना कायमस्वरूपी कर्ज आणि व्याज याच्या त्रासातून मुक्त करावं ही आग्रही मागणी पुढे आली आहे. महिला बचत गटा कडील वसुली करताना संबंधित कर्मचारी अत्यंत आक्रमक वागतात त्यांना शारीरिक मानसिक त्रास देतात या सर्वाचा उद्रेक आता होणार आहे. येत्या 13 ऑक्टोबरला सोलापुरात सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महिलांच्या बचत गटातील सदस्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे.

भाऊसाहेब आंधळकर म्हणाले या फायनान्स वित्तीय संस्थांकडे नक्की कुणाचा पैसा आहे कोण पुढारी गुंड हा पैसा फायनान्स च्या माध्यमातून जनतेचे फिरवतात आणि गरजूंची नंतर पिळवणूक करतात याचा छडा लागला पाहिजे.
 पत्रकार परिषदेस उज्वला येलुरे, सुनीता जाधव, कविता चव्हाण, रेणुका मंजुळकर, अनु सुतार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment