मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी हाजी इर्शादभाई-शेतकरी संघटना( संघर्ष ) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी हाजी इर्शादभाई
नाशिक येथे शेतकरी संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्याची बैठक होऊन त्यात प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हाजी इर्शादभाई यांची एकमताने निवड करण्यात आली असून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी ओतूर ता.जुन्नर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तान्हाजी तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांनी दिले आहे.
शेतकरी संघटना (संघर्ष) महाराष्ट्र ही माजी केंद्रीय मंत्री, भारत सरकार मा.सुबोध मोहिते सो.,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, दशरथकाका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
हाजी इर्शादभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड चे प्रदेश संघटक असून त्यांचा अनेक सामाजिक संघटनेशी संबंध आहे.त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांचा अध्यात्मिक क्षेत्रात ही नावलौकिक आहे.
" हाजी इर्शादभाई हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांच्या निवडीने शेतकरी संघटनेला व चळवळीला बळ मिळाले असून
त्यांच्या अनुभवाचा फायदा शेतकरी शोषित समाजाला नक्कीच होईल" असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले पाटील यांनी व्यक्त केला.
"शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी शोषित समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून वेळप्रसंगी शेतकरी वर्गाला जागृत करून लोकशाही पध्दतीने व अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करू"अशी प्रतिक्रिया हाजी इर्शादभाई यांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment