वडार समाजाची स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना प्रतिक माने यांनी दिले निवेदन :- माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील वडार
समाजाच्या स्मशानभूमीच्या
सुविधा पुरविण्या विषयी वडार
समाजाचे युवा कार्यकर्ते प्रतिक बंडू
माने यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना निवेदन दिले या पूर्वी ही सोलापूर चे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी, ग्रामविस्तार अधिकारी टेंभुर्णी यांना दि.२४ सप्टेंबर २०१९ रोजी निवेदन दिले आहे. कायम उपेक्षित असलेल्या वडार समाजाला मरणा नंतरही उपेक्षित ठेवण्याचे काम वरती निवेदन दिलेली अधिकारी मंडळी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. येत्या एक महिन्यात खालील मागण्यांचा विचार न केल्यास स्मशान भुमीच्या ठिकाणीच आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा वडार समाज संघटनेचे युवक कार्यकर्ते प्रतिक बंडू माने यांनी दिला आहे.
टेंभुर्णी येथील बेंबळे रोडलगत नागोबा मंदिरजवळ असलेली वडार समाजातील
स्मशानभूमी ही समस्यांचे व असुविधेच्या विळख्यात
अडकली आहे. येथील वडार
स्मशानभूमीची अवस्था खूपच वाईट असून येथे मयतीला येणाऱ्या लोकांची असुविधा होते.स्मशानभूमी मध्ये लाईट कनेक्शन नाही. त्यामुळे
रात्री-अपरात्री मयताचे अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होतात. स्मशान भूमीला संरक्षणभिंत नाही. त्यामुळे सर्व मोकाट जनावरे त्याठिकाणी येतात. मयताचे राख इतरत्र पसरवतात. त्यामुळे मयत झाल्यानंतरचे विधी करण्यास समस्या
निर्माण होतात. स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक नसल्याने चारही बाजूला माती आहे. त्यामुळे पावसाळ्यात
गुडघ्या एवढा चिखल असतो. प्रेत नेण्यास अडचणी येतात. तसेच त्याठिकाणी पाण्याची टाकी
नसल्याने मयतीला लांबून येणाऱ्या नातेवाईकांचे हाल होतात. हात-पाय धुण्यासाठी लांबून पाणी मागून घ्यावे लागते. वरील समस्यांच्या विळख्यात वडार समाजाची स्मशानभूमी असून याकडे स्थानिक पुढाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. वरील समस्यांची दखल घेऊन वडार समाजाचे निवेदन स्मशानभूमीची संरक्षण भिंतबांधण्यात यावी, फरशी व पेव्हर ब्लॉक बसवून मिळावे, वीज कनेक्शन तातडीने जोडून मिळावे तसेच याठिकाणी पाण्याची सोय करून पाण्याची टाकी बसविण्यात यावी, ही वडार समाजाकडून विनंती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment