मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पत्रकार सुरक्षा समितीची चिंतन बैठक संपन्न- *पत्रकार सुरक्षा समितीची चिंतन बैठक संपन्न*
सोलापूर -पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे चिंतन बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे होते प्रारंभी कोरोना काळात निधन पावलेले पत्रकार विजयकुमार सोनवणे, संजय वाईकर पांडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन चिंतन बैठकीला सुरुवात करण्यात आली राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक पणे काम करत असून
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*राज्यातील सर्वच माध्यमातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्व छोटया वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे बाबत*
*पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी*
*पन्नासलाखाचे विमा संरक्षण तात्काळ मंजूर करणे बाबत*
*राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता मिळणे बाबत*
*वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण बाबत*
*लॉक डाऊन मुळे अनेक वृत्तपत्राची अवस्था वाईट झाली अश्या वृत्तपत्र ला आर्थिक मदत करण्यात यावी* *
या चिंतन बैठकीत चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक व आक्रमक पणे राज्यसरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला
*पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असून मूठभर पत्रकारांना खूष करण्यासाठी राज्य सरकार ने हजारो पत्रकारांना वाऱ्यावर सोडले असून अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकार सरकार चे जावई आहेत का*? असा सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सरकार ला विचारला असून
*मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपण देखील सामना दैनिकाचे संपादक म्हणून काम केले असून एक पत्रकार राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने खूप आनंद वाटत असून आपण पत्रकारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी भावनिक साद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घालण्यात आली*
यावेळी शहर अध्यक्ष अरुण सिगडीद्दी वैजिनाथ बिराजदार राजाभाऊ पवार अक्षय बबलाद बिपीन दिड्डी, भास्कर अल्ली, सतीश बलमेरी, श्रीनिवास पेद्दी, प्रदीप पेंदापल्लीवार, देडे, इम्तियाज अक्कलकोटकर, डॉ रवींद्र सोरटे, वहाब होटगीकर, रियाज शेख, जयप्रकाश पेद्दी, पद्मिनी येळणे, अंबादास येलगेटी, अमरसिंह गायकवाड, शिवयोगी निंबाने, बाबा काशीद तानाजी माने इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment