Breaking

Friday, 25 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- ग्रामपंचायतीना थर्मल गन व पल्स आॅक्सीमीटर खरेदी करावे लागणार.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - ग्रामपंचायतींना थर्मल गन, पल्स आॅक्सीमीटर खरेदी करावे लागणार- याबाबत सविस्तर वृत्त असे की- कोरोनाला रोखण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आता थर्मल गन व आॅक्सीमीटर खरेदी करण्याच्या सूचना बीड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे गटविकास अधिकार्यांनी गुरूवारी दिल्या आहेत, व खरेदी साठी दर निश्चित करण्यात आले आहेत, त्यामुळे अनियमितता होण्याची शक्यता कमी असली तरीही तसे झाल्यास सरपंच, ग्रामसेवकावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे, 
 जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पुढे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उपलब्ध असलेल्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून थर्मल गन व आॅक्सीमीटर खरेदी करावे. ही खरेदी करण्यासाठी नियमावली देखील सोबत दिली असून त्यात म्हटल्याप्रमाणे, साहित्य गुणवत्तापूर्ण व ठरवून दिलेल्या मानकानुसारच खरेदी करावे. 
ग्रामपंचायतने खरेदीचा साठा नोंदवहीत घेऊन ते अंगणवाडी सेविकांना वाटप करावे, यात अनियमितता आढळून आल्यास नियमानुसार थेट सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल, खरेदी करण्यासाठी नियमावली देखील सोबत दिली असून त्यात म्हटल्याप्रमाणे साहित्य गुणवत्तापूर्ण व ठरवून दिलेल्या मानकानुसारच खरेदी करावे, ग्रामपंचायतीने खरेदीचा साठा नोंदवहीत घेऊन ते अंगणवाडी सेविकांना वाटप करावे यात अनियमितता आढळून आल्यास नियमानुसार थेट सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment