सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संभाजी ब्रिगेड च्या लढ्याला अखेर यश- *संभाजी ब्रिगेड च्या लढ्याला अखेर यश*..
*संभाजी ब्रिगेड नेहमीच महापुरुषांच्या सन्मानात आक्रमक आणि अग्रेसर राहिलेली आहे. भंडारकर प्रकरणानंतर 2004 मध्ये पहिल्यांदा संभाजी बिडी च्या विरोधात संभाजी ब्रिगेड ने आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पातळींवर संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ व साबळे वाघिरे कंपनीचे संचालक यांच्यात चर्चा होत होत्या. त्याचा पहिला टप्पा म्हणून संभाजी बिडीच्या बंडलांवर असणारा छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्र कंपनी तर्फे काढून टाकण्यात आलं, दरम्यानच्या काळामध्ये हे नावही आपण बदलाव असा आग्रह संभाजी ब्रिगेडने केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काही काळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही ते नाव बदलू असे आश्वासन साबळे वाघिरे कंपनीकडून संभाजी ब्रिगेडला देण्यात आलं. त्यावर पुढे कुठलीही कारवाई होत नाही हे लक्षात आल्यानंतर मागील दोन महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेड ने या कंपनीला अंतिम इशारा दिला आणि आता कंपनीने या बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते. त्याबद्दल निश्चितपणे त्यांचे अभिनंदन करणं गरजेचं वाटतं. सातत्य, चिकाटी आणि पाठपुरावा हे जर आपण प्रामाणिक पणे करत राहिलो तर आपल्या कार्याला निश्चितपणे यश मिळतं हा संदेश यातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे अभिनंदन करत असतानाच नाव बदलण्यावरून महाराष्ट्राच्या जनभावनेचा आदर राखत त्याला जो काही सकारात्मक प्रतिसाद साबळे वाघिरे कंपनीने दिला आहे त्याबद्दल त्यांचेही निश्चितपणे आभार संभाजी ब्रिगेड व्यक्त करते.. आज पुन्हा एकदा साबळे वाघिरे कंपनीकडून शिवशंभु भक्तांनी आम्हाला आणखी काही वेळ द्यावा ही विनंती केलेली आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास वेळ लागतो हे आम्ही जाणतो, परंतु पुन्हा एकदा जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला तर गाठ संभाजी ब्रिगेड शी आहे हे ध्यानी असू द्यावे*...अशी माहिती VBP NEWS शी बोलताना सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment