संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान तातडीने जमा करा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करणार- भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश पाटील
मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट देशावर घोंगावत आहे. लोकांना रोजगार नाही, उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर योजनांचे जवळपास 15 ते 20 हजार लाभार्थ्यांचे अनुदान मागील 4 ते 5 महिन्यापासून मिळाले नाही. हे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर 25 सप्टेंबर च्या अगोदर जमा करावे अन्यथा 25 सप्टेंबरला माढा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश पाटील व भारतीय जनता महिला मोर्चा तालुकाध्यक्ष संध्या कुंभेजकर यांनी संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून सौ. देसाई मॅडम यांच्याकडे दिले यावेळी यादव साहेब लखन पवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment