*बेंद ओढा कुर्डू पाणी सोडावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन*
*मौजे.कुर्डू तालुका माढा येथील बेंद ओढा परिसरात यावर्षी सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला असला तरी बेंद ओढा अद्यापही कोरडा ठणठणीत आहे शिवाय या परिसरातील पाण्याची पातळी वाढलेली नाही सध्या धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे तर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे या धरणावर असलेल्या सर्व प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे . राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी कुर्डू च्या बेंद ओढा परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने बेंद्रे ओढ्याला पाणी आलेले नाही अद्यापही ओढा कोरडा ठणठणीत आहे या भागातील शेतकऱ्यांचा शेतीला असलेला जोडधंदा दूध व्यवसाय अडचणीत येणार आहे दुष्काळाच्या परिस्थितीतही तीस हजार लिटर दररोज दुधाचे संकलन करणारे गाव म्हणून कुर्डू ची ओळख आहे सध्याच्या पाण्याच्या परिस्थितीमुळे लोकांना हा दूध व्यवसायही ही सोडून द्यावा लागेल त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर होणार आहे बेंद ओढ्याला पाणी सोडण्यासाठी सुमारे 36 दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते परंतु तात्पुरते आश्वासन देऊन हे उपोषण संपवण्यात आले वयानंतर प्रशासन व शासनाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे*.
*सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जो पाण्याचा विसर्ग आहे यामुळे हे पाणी कर्नाटक कडे वाहून वाया जात आहे हे वाया जात असलेले पाणी बेंद ओढ्यात सोडुन शेतकऱ्यांच्या लाभासाठी उपयोग करावा . अन्यथा कुर्डु बेंद ओढा क्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थ शुक्रवार दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती रोजी तीव्र आंदोलन करतील व होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार असेल अशी मागणी मा.कार्यकारी अभियंता,जलसंपदा विभाग यांच्याकडे केली*.
*सदरचे निवेदन प्रांताधिकारी शिवमती ज्योती कदम यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवश्री सचिन जगताप- जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,सोलापूर,शिवश्री सुहास टोणपे-जिल्हा सचिव,शिवश्री बालाजी जगताप- तालुकाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,माढा,शिवश्री अविनाश पाटील-ता.उपाध्यक्ष,शिवश्री गणेश शिंदे-संपर्कप्रमुख, करमाळा,शिवश्री सुभान जगताप ई*....
No comments:
Post a Comment