Breaking

Saturday, 5 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - टेंभूर्णीत 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ह्वावे या संदर्भात रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील सर यांची मा.आ.सदाभाऊ खोत साहेब यांचे कडे मागणी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - टेंभूर्णीत 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ह्वावे या संदर्भात रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील सर यांची मा.आ.सदाभाऊ खोत यांचेकडे मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की टेंभूर्णी शहर हे पुणे- सोलापूर या महामार्गावरील मोठे जंक्शन चे ठिकाण आहे व सद्यस्थितित टेंभूर्णी येथे औद्योगिक वसाहत महामंडळाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे व चालूला टेंभूर्णी येथे ग्रामीण रूग्णालय असून तेथे रूग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसून रूग्णांचे हाल होत आहेत तरी या संदर्भात टेंभूर्णीतील नागरिकांनी याचा शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणून टेंभूर्णी व परिसरातील 20-25 गावांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना वेळेत उपचार मिळावेत व सध्या नागरिकांना उपचारासाठी पुणे, सोलापूर,मुंबईत जावे लागते जर का येथे रूग्णालय झाले तर लोकांचा वेळ व पैसा वाचेल त्यामुळे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय त्वरीत मंजूर करावे व शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा अशी मागणी रयतक्रांती संघटनेचे प्रा सुहास पाटील सर यांनी लेखी निवेदनाद्वारे मा.आ.सदाभाऊ खोत यांचेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment