जनशक्ती ने इशारा देताच
अंजली सुरवसे खून प्रकरणातील ३ आरोपींना केली टेंभुर्णी पोलिसांनी अटक
राजकीय हस्तक्षेपामुळे मिटकलवाडी (ता. माढा) येथील अंजली सुरवसे खून प्रकरणातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत त्यामुळे आरोपी बिनबोभाटपणे फिरत आहेत असा आरोप करून आरोपींना अटक न झाल्यास आज सोमवार दि.९ मे रोजी टेंभुर्णी पोलिसांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबासाहेब कोळेकर यांनी दिला होता मात्र जनशक्ती च्या आंदोलनाचा धसका घेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून आणखी तीन आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित आरोपींना दोन दिवसात अटक करू असा शब्द जनशक्ती संघटनेला दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, मृत अंजली सुरवसे हिला सासरच्या मंडळींनी छळ करून अत्यंत क्रूरपणे मारून टाकले होते. पोलिसांनी केवळ अपघाताचा गुन्हा नोंद करून एक प्रकारे अन्यायच केला होता. मात्र जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी या प्रकरणाची सत्यता व परिस्थिती पाहिल्यानंतर अंजलीचा अपघात नसून घातपात असल्याचे ठोसपणे सांगून या प्रकरणातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. तसा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र पती वगळता इतर कोणालाही अटक करण्याचे औदार्य पोलिसांनी दाखविले नाही. मात्र जनशक्ती संघटनेने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देताच ७ - ८ पोलिसांनी कानाडोळा केला होता त्यांच्या तपासासाठी तीन पथके रवाना करून निवेदन देताच बारा तासाच्या आत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारे सासु अन्नपूर्णा गोवर्धन सुरवसे, दीर वैभव गोवर्धन सुरवसे, अंजली बाळासाहेब थिटे या प्रमुख तीन आरोपींना अटक करण्यात आली. तर सूत्रधार आरोपी मुळे दाम्पत्यांना येत्या दोन दिवसात अटक करू असा शब्द पोलिसांनी दिला.
यावेळी पंढरपूर तालुका युवक प्रमुख गणेश ढोबळे, बापूसाहेब मोहिते, राजाभाऊ कणसे, जयदेव संभाजी कदम, राजेश कदम, संजय कदम, बालाजी कदम, दत्ता पवार, अनिल मुळे, नामदेव मुळे, नागनाथ कदम, आंबादास कदम यांच्यासह जनशक्ती चे पदाधिकारी उपस्थित होते.
▪️ आंदोलनासाठी गेले आणि सत्कार करून आले
- अंजली सुरवसे खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने पोलीस स्टेशन समोर आंदोलन पुकारले होते. आंदोलनाचा इशारा मिळताच पोलिसांनी प्रमुख आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या ही माहिती मिळताच पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेंभुर्णी पोलिसांचा जनशक्ती संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment