Breaking

Friday, 15 April 2022

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- तरूणांनी ध्येय्य प्राप्तीचा लढा लढताना बाबासाहेबांचे विचार/ लेखन शस्त्र म्हणून वापरावे-प्रफुल्लजी खपके.


*"तरुणांनी ध्येयप्राप्तीचा लढा लढताना बाबासाहेबांचे विचार/लेखन 'शस्त्र' म्हणून वापरावे" - प्रफुल्लजी खपके*

कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर कॉलेज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन

बेलापूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये व्याख्यानमालेचे व खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉलेजच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे मॅडम यांनी भूषवले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या सत्राचे मुख्य वक्ते व्याख्याते प्रफुल्ल खपके यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्य आणि कर्तृत्व' या विषयाची मांडणी केली. यावेळी कार्य आणि कर्तुत्वावरती बोलत असताना समाजाभिमुख कार्य केल्यानंतर कर्तुत्व मोठे होते याची प्रचिती आपल्याला बाबासाहेबांकडे बघून दिसते परंतु कार्य करण्यासाठी आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये वाचन, तळमळ, निष्ठा या त्रिसूत्रीची प्रामाणिक जोड आपल्याला घालता आली पाहिजे आणि आपल्या कार्यकर्तृत्वा प्रति एकनिष्ठ राहून ध्येयप्राप्तीसाठी वेडे होता आले पाहिजे. हे बाबासाहेबांनी आपले विद्यार्थी जीवनात अवगत केल्यामुळे कर्तृत्व महान होऊ शकले. विश्वाला आदर्श वाटेल असे व्यक्तिमत्त्व उभे राहू शकले आणि म्हणून तरुणांनी बाबासाहेब डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावेत त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि आपल्या ध्येयप्राप्तीसाठी मेहनत करावी असे अनेक पैलू भाषणामध्ये यावेळी मांडले. 
द्वितीय सत्र प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतून महिलांना मिळालेला सामाजिक न्याय' या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,
समान समान न्याय, समान संधी, समाजात स्त्रियांना समान सत्ता स्वातंत्र्य, समानदर्जा, समानशिक्षण मिळाले तरच स्त्रियांना सामाजिक न्याय मिळेल असा दृष्टिकोन ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन वृत्तपत्रांमधून आपल्या विचारांची मांडणी केली. स्त्रियांना आर्थिक सत्ता अधिकार दिले पाहिजेत .आर्थिक दृष्टीने त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे. स्त्रियांना रोजगाराभिमुख करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्रिया या अर्थ उत्पादनात सहभागी होणे आवश्यक आहे. स्त्रियांनी आर्थिक उत्पादन केले तर त्यांच्या घरातील आणि समाजातील आवाज प्रतिमा वाढते. स्वातंत्र्याचा अनुभव घेता येतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येतो .स्त्रियांना सामाजिक संधी प्राप्त होते. त्यांचा सामाजिक स्तर उंचावतो. त्या निर्णय घेऊ शकतात. महिला स्वावलंबी झाल्या तर त्यांच्या लैंगिक आणि प्रजनन वर्तनावर स्व नियंत्रण ठेवता येते म्हणून स्रियांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मांडतात. असे मत व्यक्त केले. 
यानंतर समारोप सत्र प्रा. विठ्ठल सदाफुले यांनी चालवले यावेळी ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि आजचे राजकारण' या विषयाची मांडणी करताना
भारतीय संविधान भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे कारण संविधानामध्ये जात, धर्म कोण कोणत्या भाषेचा माणूस आहे स्त्री आहे का पुरुष आहे  असा भेदभाव करत नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कायदे तयार केले. आणि भारतीय संविधान भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. कारण संविधानामध्ये जात, धर्म कोणत्या भाषेचा कोण माणूस आहे. स्त्री आहे का? पुरुष आहे?  असा भेदभाव करत नाही. तसेच राज्यघटनेशी सुसंगत आहेत का नाही हे पाहिले जाते आणि जर तो  कायदा राज्यघटनेशी विसंगत असेल तर तो कायदा कमी करण्याचा अधिकार राज्यघटनेला आहे. असे मत यावेळी मांडले. यानंतर खुल्या सत्रात प्रा. डॉ.बी.एन.पवार यांनी भारतीय राज्यघटना व आजचे राजकारण यांवर चर्चा केली.चर्चासत्राचे सुत्रसंचालन कला शाखेची विद्यार्थिनी कोमल भांड हिने केले.उपस्थित विद्यार्थी वर्गाचे व प्राध्यापकांचे आभार प्रदर्शन डॉ. संजय नवाळे यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम संपला.

No comments:

Post a Comment