बहुजन ब्रिगेड संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारणी बरखास्त – राजेश खरे
संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हाबहुजन ब्रिगेड संघटनेची फादर बॉडी व सर्व अंगीकृत विभागाची कार्यकारणी आज दिनांक 29/3/2022 वार बुधवार रोजी बरखास्त करण्यात आल्याची माहिती बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी प्रसार माध्यमाला दिली. तसेच येत्या एक महिन्यांमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कार्य अहवाल पाहून त्यांना योग्य ठिकाणी व योग्य पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.निष्क्रिय पदाधिकारी यांना पदावरून काढण्यात येणार असून सक्रिय पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना बढती देण्यात येणार असल्याचे खरे यांनी सांगितले तसेच बाकी जिल्ह्याचे ही कार्यकारणी लवकरच बरखास्त करण्यात येणार आहे असेही यावेळी राजेश खरे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment