Breaking

Saturday, 26 March 2022

विशेष प्रतिनिधी/ प्रेरणाताई तोडकरी- पीएसआय महेश मुंडे यांचा पंढरपूर तालुका पोलिस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न.


करकंब येथे कार्यरत असणारे पीएसआय महेश मुंडे साहेब यांची मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी करकंब बार्डीचे पोलीस पाटील एडवोकेट नानासाहेब शिंदे, सागर जमदाडे, रामकृष्ण हेगडे, विशाल अमराळे, बाळासाहेब सुतार, विष्णू गवळी आदीसह सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते
करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सत्तावीस गावांमधील गुन्हेगारांवर ती सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा वचक होता तसेच करुणा महामारी च्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

No comments:

Post a Comment