श्री शंकर अशोक बागल यांची कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली श्री शंकर बागल हे कुर्डुवाडी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष कै अभिमान बागल यांचे नातू व माजी नगरसेवक कै अशोक बागल यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे त्यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे तसेच नूतन शहराध्यक्ष श्री शंकर बागल हे देखील समजूतदार व मवाळ स्वभावाचे आहेत त्यामुळे पक्षवाढीसाठी मदतच होणार आहे शहर भाजपा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही केंद्रामध्ये जे घटक पक्ष भाजपा बरोबर आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन सर्वच्या सर्व 20 जागा लढवणार असल्याचे प्रतिपादन नुतन शहराध्यक्ष शंकर बागल यांनी केले. कुर्डुवाडी शहर भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील,तालुका सरचिटणीस सुधीर गाडेकर,अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष दिलीप बारूंगळे,भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव बागल,प्रज्ञावंत आघाडी चे जिल्हाध्यक्ष अमोल कुलकर्णी,करण भगत,सचिन गायकवाड,आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी नुतन शहराध्यक्ष यांचा सत्कार भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख संघटन सचिव धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आदेशान्वये तालुका अध्यक्ष योगेश बोबडे व सचिव जयसिंग ढवळे यांनी शंकर बागल यांची शहराध्यक्षपदी एकमताने निवड केली असल्याचे जाहीर केले पुढे बोलताना बागल म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस,राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या विचारांना अभिप्रेत नव्या व जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळ घालून आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.नवीन कार्यकारिणीची निवड लवकरच करण्यात येणार असून भाजपाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले,याप्रसंगी प्रस्ताविक करण भगत यांनी तर सूत्रसंचालन सुधीर गाडेकर केले तरआभार अमोल कुलकर्णी यांनी मानले.


No comments:
Post a Comment