Breaking

Saturday, 12 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नेहरू युवा केंद्रामार्फत बालकामगार सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यक्रम साजरा.


*जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नेहरू युवा केंद्रामार्फत बालकामगार सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यक्रम साजरा*

   क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या निरहुवा केंद्रामार्फत बालकामगार सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यक्रम व वैयक्तिक संबंध कार्यक्रम व सुविधा अभियान कार्यक्रमाचे बहुउद्देशीय सभागृह जिल्हाधिकार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री मिलिंद शंभरकर साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संचालक नेहरू युवा केंद्र, महाराष्ट्र राज्य माननीय श्री प्रकाश मणुरे, जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, प्र. प्रकल्प संचालक राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प अधिकारी अशोक कांबळे तसेच सर्वेक्षक मार्गदर्शक तय्यब शेख जीवन दिशा फाऊंडेशन, सोलापूर ह्या मान्यवरांची उपस्थितीत लाभली. 
    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. 

        मा. जिल्हाधिकारी साहेब बोलताना नेहरू युवा केंद्राचे काम चांगले असून भविष्यात त्याच्या बरोबर भरपूर काम करायचे असून अधिकारी ही युवा मिळाला आहे. सर्वेक्षण प्रशिक्षणासाठी हजर असणाऱ्यानी सर्वेक्षण योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन केले.  प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. श्री. प्रकाश मणुरे यांनी दृष्टीकोन चांगला ठेवून योग्य पद्धतीने सर्वेक्षण करा सर्वेक्षण करताना सर्व नियमाचे पालन करून भविष्यात बालकामगार उदभवणारच नाही यांची सर्वानी काळजी घेऊ असे सांगितले. 
       मान्यवरांच्या शुभहस्ते सामाजिक , क्रीडा, शैक्षणिक ,आरोग्य  कोविड या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय युवा मंडळ म्हणून भैरवनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था मु. पो. तालुका करमाळा यांना  पारितोषिक व रोख रक्कम 25000 देऊन गौरवण्यात आले. तसेच रुक्माई प्रतिष्ठान नेहरूनगर यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. 

       मा. श्री. नागेंद्र डोंगरराजे यांनी डिजिटल बँकिंग सिस्टीम या विषयावर मार्गदर्शन केले.  

    मा. श्री तय्यब शेख यांनी  बालकामगार सर्वेक्षण करताना घ्यावयाची काळजी व सर्वेक्षण फॉर्म कसे भरावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

 कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक साक्षी होैदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला अंकुश उपाळे,अविनाश शिंदे,शिवशंरण गोसावी आदी उपस्थित होते.

     सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा युवा केंद्राचे लेखाधिकारी सुभाष चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment