Breaking

Wednesday, 23 February 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगड मध्ये संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी.


पंढरपूर सिंहगड मध्ये संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी
संपुर्ण आयुष्य जगाला स्वच्छता संदेश देणारे संत गाडगे महाराज यांची जयंती कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सामाजिक प्रबोधनातुन लोकांच्या मनात ज्या अंधश्रद्धा घर करून बसलेल्या होत्या त्या अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा संत गाडगे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना पटवून देऊन सामाजिक उपक्रमातुन स्वच्छता दिला आहे.
   एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथे बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, प्रा. अमोल जगदाळे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. दत्तात्रय कोरके, एकनाथ इंगवले, पांडुरंग परचंडे, अकुंश आवताडे, गणेश वसेकर आदींसह अनेक कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment