Breaking

Wednesday, 9 February 2022

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - माढा येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न.


सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठान माढा संचलित मित्र प्रेम मल्टीस्पेशलिटी चारिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर माढा व प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव तसेच अन्नपूर्णा मेडिकल मानेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी सभामंडप येथे भव्य सर्वरोग निदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना साठे म्हणाले जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी व अल्पदरात औषधोपचाराचा लाभ घ्यावा. 
सदरच्या या शिबिरामध्ये हृदय रोग उच्च रक्तदाब, मधुमेह फुप्फुसाचे आजार लिव्हर किडनी चे आजार मेंदूचे आजार तसेच डोळे तपासणी तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर थोरात साहेब मानेगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी अमोल शिंदे मित्र प्रेम मल्टीस्पेशालिटी चे डॉक्टर विकास मस्के डॉक्टर प्रताप चौरे मानेगावचे डॉक्टर ज्ञIनेश्वर पारडे डॉक्टर युवराज शिरसागर डॉक्टर नितीन देशमुख यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांनी गर्दी केली होती. यावेळी रुग्णांना डोळे तपासून अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शीतल जोकार खैराव सरपंच प्रताप नागटिळक, प्रमोद भेंडकर ,आलम जमादर ,अनिल भेंडकर, बिरूभैया शेळके, नारायण मोठे ,अमोल नाईकवाडी, खंडू भोगे ,रशीद शेख राजाभाऊ माने ,गजेंद्र माने ,नसीर शेख , गणपत साठे, समाधान लटके ,प्रवीण  हरदाडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment