Breaking

Friday, 28 January 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्ष पदी रोहिदास भोरकडे यांची निवड.


न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी रोहिदास भोरकडे यांची निवड

मंगळवेढा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हुलजंती गावचे सुपुत्र रोहिदास गजेंद्र भोरकडे यांची "न्याय निवाडा लोकनेता फौंडेशन (रजि) दिल्ली" या संघटनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हुलजंती येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि सामाजिक कार्याची दखल घेत फौंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष किसन भजनावळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

२६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले, म्हणजे खऱ्या अर्थाने येथील प्रजेला अधिकार प्राप्त झाले. त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फौंडेशनने व जिल्हाध्यक्षांनी मला अधिकाररुपी जी जबाबदारी दिली आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्याचा व भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेन, असे नूतन तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सोलापूर जिल्हा सचिव निसार शेख, सरपंच मिनाक्षी कुरमत्ते, शिवानंद कुरमुत्ते, माजी सरपंच गोविंद भोरकडे, ग्रा.पं सदस्य अर्जुन मल्लाळे, शांतीलाल भोरकडे, ग्रामसेवक एस.बी.शिंदे, मंगळवेढा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष जामदार, ग्राहक मंच सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर आतार, यवा नेते मारुती पेटर्गे, विठ्ठल हुलजंती, युवराज भजनावळे, बिरदेव जविर, प्रदीप भोरकडे, सुधाकर कराबी, दयानंद भोरकडे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment