मंगळवेढा (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापन दिन सोहळा हुलजंतीत सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे व शासकीय आदेशाचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम व उपक्रम रद्द करण्यात आले.
हुलजंती ग्रामपंचायतीमध्ये देखील ध्वजारोहण साधेपणाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी सर्वांना शुभेच्छा देऊन सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
त्याच्याबरोबर गावातील शाळा, प्रशाला व तलाठी कार्यालय येथेही शासकीय पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच बाळासाहेब माळी, माजी सरपंच गोविंद भोरकडे, ग्रा.पं. सदस्य महादेव पेटर्गे, शांतीलाल भोरकडे,
शिलवंती येड्डे, अनिता भोरकडे, मंदाकिनी माळी, सविता शिंदे, कलाप्पा बुरकुल, अर्जुन मल्लाळे, कोतवाल गुलाब सोनवले, पोलीस पाटील जिवाजी सोनवले, श्री महालिंगराया हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती जामदार, उपाध्यक्ष रसूल अत्तार, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रोहिदास भोरकडे, ग्राहक मंच सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर आतार, मारुती पेटर्गे, रमेश शिंदे, विठ्ठल हुलजंती, श्रीकांत मासाळ, शिवाजी जकवडर, दिपक खानविलकर, प्रशालेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा वर्कर आदी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत लिपिक तथा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष जामदार यांनी मानले.


No comments:
Post a Comment