Breaking

Thursday, 6 January 2022

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - सक्तीचे लसीकरण थांबवा...बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश देवकते यांचे उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांना निवेदन.


बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश देवकते यांनी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपुर यांच्या कडे सक्तीचे लसीकरण  स्थगीत करावे न केल्यास बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने महाराष्ट्र भर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल हे निवेदन देण्यात आले 

ज्याअर्थी मा.न्यायलयात मा.केंद्र शासनानी वॅक्सीन घेणे देशातील कोणत्याही नागरीकांना सक्तीचे  नाही याबाबत ॲफ़ीडेबिट दिले आहे तसेच मणीपूर.कर्नाटक.गुजरात.राजस्थान.येथील मा.उच्च न्यायलयानी वॅक्सीनच्या सक्ती बाबत वॅक्सीन घेने सक्तीचे केले जाऊ शकत नाही सक्तीकरणे भारतीय सविधान कलम १४.१९.व २१ चे उलघन आहे असे निकाल दिले आसतना महाराष्ट्र रज्यातील अनेक जिल्यातील मा. ज़िल्हाधिकारी व मा.विभाग प्रमुख यांनी सर्वसामान्य नागरीकानां कर्मचारी कामगार व मजुराना वॅक्सीन घेने सक्तीचे केले आहे तसेच. शासकीय. मुलभुत योजना देणे बंद केले आहे  प्रवास. शाळा. कॅालेज. बॅंक. शासकीय कार्यलय व सार्वजनिक सार्वजनिक.ठिकानी नागरीकांना प्रवेश देणे बंद केले आहे या विरोधात लवकरात लवकर वॅक्सीनच्या सक्ती बाबत वॅक्सीन घेने सक्तीचे आदेश बंद करावे व नाही तर
 बहुजन सत्यशोधक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे  महाराष्ट्र भर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल हे निवेदन देण्यात आले  यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश देवकते, जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे जिल्हा महासचिव योगेश इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष  योगेश नाईकनवरे, तालुकाध्यक्ष मसा नाईकनवरे, आबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ, आप्पासाहेब ओहोळ, सतीश वाघमारे, महिला पंढरपूर तालुका अध्यक्ष पूजा झरकर, उपाध्यक्ष पुष्पा जगताप, शिवाजी ओहोळ, रोहित रावडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment