Breaking

Saturday, 18 December 2021

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - गाव करील ते राव काय करील...पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुतेंनी असे सांगत हे केले आवाहन.


सोलापूर | "गाव करील ते राव काय करील" ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी असे सांगून केले हे आवाहन

सोलापूर : संपूर्ण जगभरात कोरोना वायरसच्या नवा व्हेरियंट असलेल्या ओमीक्रोन वायरसच्या संसर्गाची धसका घेण्यात आला आहे. 85 टक्के देशात या वायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही ओमीक्रोनचा संसर्ग झाला असला तरी या नव्या व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे संपूर्ण लसीकरण हाच त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे प्रशासनातील अधिकारी ग्रामीण भागात लसीकरणावर भर देत आहेत. 
पोलीस पाटील दिनानिमित्त गुळवांची गावात कार्यक्रम झाला. तिथे उपस्थित पोलीस पाटलांच्या सत्कारानंतर बोलताना पोलीस अधीक्षक सातपुते यांनी पोलीस पाटलांनी लसीकरणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून द्यावे, ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये समन्वय साधावा कारण "गाव करील ते राव काय करील" असे सांगून लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांना कळकळीचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment