बहूजन सत्यशोधक संघाची अंजनगाव येथे महत्वपुर्व बैठक संपन्न!
दि-१६/१२/२०२१ रोजी अंजनगाव, ता.माढा या ठिकाणी बहुजन सत्यशोधक संघाची महत्वपूर्वक बैठक पार पडली. काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्या. त्यावेळी प्रमुख उपस्थिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुनीलजी ओहोळ उपस्थित होते. सूत्र संचलन आणि बैठकीचे अध्यक्ष म्हणून बहुजन सत्यशोधक संघटनेचे नेते मा.प्रशांत नाईकनवरे यांनी सर्व महापुरुषाना अभिवादन करून लोकांना मार्गदर्शन केले , ते म्हणाले सर्व जाती धर्मातल्या लोकांना जागृक होण्याची गरज आहे, कारण आपल्या सर्व महापुरुषांनी कधी एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य केले नाही समाजामध्ये जाती समता निर्माण होण्यासाठी काम केले आहे. आणि त्यांचे कार्य हे मर्यादित जाती पर्यंत चोकटीत बांधून ठेवण्याचे काम ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलं आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांनी अकरा पगड जातिंना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे सर्व लोकांना हक्क अधिकार अधिकाराची तरतूद असणारे संविधान आपल्या देशाला समर्पित केले.आणि ह्या ब्राह्मणी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे , महात्मा फुले हे माळ्यांचे, अहिल्यादेवी होळकर हे धनगरांचे, शाहिररत्न अण्णाभाऊ साठे हे मातंगाचे असे लोकांना सांगून जाती-जाती मध्ये फूट पाडून लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी आपण सर्व बहुजनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असे त्यावेळी ते बोलताना म्हणाले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सदस्य मा. अनिल सरवदे यांनी लोकांना संघटनेचा उद्देश काय आहे,आणि संघटना कोणत्या बेस वर काम करते याची माहिती दिली, आपण संघटनेत काम करत असताना आपल्याला काय केले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख उपस्थिती असलेले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुनीलजी ओहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत लोकांना मार्गदर्शन केले, ते बोलताना म्हणाले महाराष्ट्रात कित्तेक लोकांवर अन्याय होत असून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बहुजन सत्यशोधक संघ प्रामाणिकपने पार पाडत आहे. न्याय मिळवण्यासाठी लोक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात , तरीदेखील लोकांना न्याय मिळत नाही, या उलट जो तक्रार धारक आहे त्यांच्यावरच दरोड्या सारखे गुन्हे दाखल केले जातात. मग अशावेळी लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? आणि गावा-गावा मध्ये विरोधी पक्षनेते लोकांना एक मेकांत भडकावून खोट्या अँट्रोसिटी दाखल करण्यास लोकांना भाग पडतात. ह्या ब्राह्मणी व्यवस्था मुळे लोकांना सद्या न्याय मिळत नसून उलट त्यांच्यावरच अत्याचार होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्यत घेऊन आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्वांनी उत्कृष्ट पणे केले पाहिजे . आणि काम करत असताना संघटना पूर्णतः तुमच्या पाठिशी असेल असा विश्वास त्यावेळी त्यांनी लोकांना दिला. त्यानंतर बैठकी दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काही जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या, आणि त्यांना पुढिल कार्या साठी शुभेच्या देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मा.गणेश देवकते,जिल्हा उपाध्यक्ष मा.नितीन वाघमारे, प्रशांत जी नाईक नवरे, सुनील लोंढे, आदर्श लोंढे ,आप्पासाहेब ओहोळ, सुरेश वाघमारे, पूजा झरकर,योगेश इंगळे,योगेश नाईकनवरे, मसाजी नाईकनवरे, नानासाहेब वाघमोडे, रोहित रावडे, दादा गायकवाड, अरबाज मुलांनी,समाधान माळी, कुणाल सूर्यवंशी, राजेश गायकवाड, विश्वास रावडे,ऋषिकेश लंगर,आदित्य शिंदे,धनाजी नाईकनवरे, महेंद्र शिंदे आदर्श लोंढे व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment