*फळरोपवाटीकेतील रोजंदारी मजूरांना फरकाची रक्कम देण्यास शासनाची मंजूरी*
*मजुरात आनंदोत्सव !*
-----------------------------------------------
माजलगाव दि २७ ( बातमीदार ) कृषि खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या तालुका फळरोपवाटीका बीड येथील रोजंदारी मजुरांना, कायम मजूराच्या मासिक वेतनाच्या १/२६दराने सन १९८८ पासूनचा फरक मिळावा म्हणून मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने कॉम्रेड उध्दव नामदेव शिंदे यांनी अर्ज आय.डि.ए. क्रमांक १६/२०१५ ही केस कामगार न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक ०१/०६/२०१५ रोजी दाखल केली होती. या केसचा निकाल दिनांक २०/०४/२०१८ रोजी मजूरांच्या बाजूने लागला. यामध्ये सन १९८८ नंतर ज्या वर्षी मजूरांची २४० दिवसाची सेवा पूर्ण होईल त्या वर्षापासून हे मजूर १/२६ दराने फरक मिळण्यास पात्र राहातील तसेच ही केस ज्या तारखेस कोर्टात दाखल केली त्या तारखेपासून ते ही रक्कम मजुरांना मिळपर्यंत या रक्कमेवर द.सा.द.शे. १० टक्के व्याज देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. या निकालाच्या विरुद्ध कृषि खात्याने हायकोर्टात रिटपिटिशन क्रमांक ६१५२/ २०१९अन्वये अपिल दाखल केले होते. या अपिलामध्ये हायकोर्टाने १० टक्के व्याजाऐवजी ६ टक्के व्याज अकारणी करुन कामगार न्यायालयाचा बाकीचा निकाल कायम ठेवला. मा. हायकोर्ट व कामगार न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी म्हणून संघटनेच्या वतीने शासनाच्या पातळीवर सतत पाठपुरावा केला. हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. तेंव्हा २० आक्टोबर २०२१ रोजी शासनाने ही रक्कम मजूरांना देण्यासाठी शासकिय आदेश (जी.आर.) पारित केला आहे.
त्यामुळे मजूरात आनंदाचे वातावरण तयार झाले असून, ही रक्कम लवकरच मजूरांना मिळणार असल्याची माहिती संघटनेचे सहचिटणीस कॉम्रेड उध्दव नामदेव शिंदे ,कॉम्रेड गणेश थोरात व कॉम्रेड बाबासाहेब पवार यांनी दिली.


No comments:
Post a Comment