Breaking

Wednesday, 22 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सेवानिवृत्त शिक्षकांना नोव्हेंबर महिन्यातील पेन्शन न मिळाल्याने शिक्षकात असंतोष....हनुमंत कुंभार गुरूजी.


सेवानिवृत्त शिक्षकांची नोव्हेंबर महिन्याची पेन्शन न मिळाल्यामुळे शिक्षकात असंतोष निर्माण झाला असल्याची माहिती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य हनुमंत कुंभार यांनी सांगितले.
       सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची माहे नोव्हेंबर २०२१ ची पेन्शन अद्याप मिळालेली नाही. अनेक कुटुंब पेन्शन वर अवलंबून आहेत. काही विधवा महिला. कुटुंब निवृत्ती वेतन धारक. आजारी शिक्षक हे सर्व पेन्शन वर अवलंबून आहेत. चौकशी केली असता शिक्षकांच्या पेन्शनसाठी सुमारे सहा कोटी रुपये कमी आले असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यामध्ये सेवेतील प्राथमिक शिक्षकांचा नोव्हेंबर महिन्याचा तसेच जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आदा करण्यात आलेली आहे. परंतु जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन अद्याप न झाल्याने शिक्षक अडचणीत असून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाल्याची माहिती श्री कुंभार यांनी दिली. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मा दिलीप स्वामी साहेब यांनी स्वतः लक्ष घालून जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची पेन्शनची समस्या सोडविण्यात यावी अशी शिक्षकांची मागणी आहे.
        यावेळी सुभाष साळुंके, हरिभाऊ नाळे, दत्तात्रेय रेपाळ, अंबादास सुर्वे, वसंत पाटील हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment