Breaking

Wednesday, 1 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांची टी.सी.एस कंपनीत निवड.


*पंढरपूर सिंहगडच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांची टी.सी.एस. कंपनीत निवड. 

माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात टीसीएस हि भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  (टी.सी.एस.} म्हणजे ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था असलेल्या कंपनीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अमन सिंग, मयुरी चिंचोलीकर, वैष्णवी कुलकर्णी, विशाल लवटे, विद्याराणी क्षीरसागर, प्रियंका माने, शुभम लहांडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सिद्धेश्वर दळवे, गौरी ताठे, धनश्री नागणे, मंदार उत्पात, सौरभ देवमारे, ऋतुजा देठे, रोहित गायकवाड, सौरभ दिघे, धीरज तपकिरे, अंकित पाठक, ओंमकार परदेशी, साहिल नदाफ, अविनाश बनसोडे, सुर्यकांत सोनटक्के, अभिषेक घोटगे, प्रदिप धंगापुरे, सतिश कचरे, श्रीराम मुले, जयदत्त आराध्ये, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील आकाश वसेकर, जोत्सना राऊत, शिवाली गाडेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील वैष्णवी गुलाखे, अतिक पठाण, मधुकर बिडवे, ज्ञानेश्वरी शिंदे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सलमान बेदरेकर, उमा गायकवाड आदी विद्यार्थ्यांची मुलाखती मधून निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ३.३६ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
    औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात असल्याने महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय व नामांकित कंपनीत प्लेसमेंट होत आहेत. महाविद्यालयाला विविध कंपन्या भेटी देत असून त्यातुन विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     टी.सी.एस. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment