कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिवम कुमार या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
"टुदिप टेक्नॉलॉजीस" कंपनी एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांना डिजिटल करण्यापासून ते डिजिटल होण्यापर्यंत मदत करते. ग्राहक-केद्रिंत म्हणून आम्ही कंपन्याना सेवांचा अनुभव आणि लाभ घेण्याच्य पद्धतीची पुनर्परिभाषित करत आहोत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेले शिवम कुमार यांची ऑनलाईन घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. कंपनीकडून शिवम कुमार यांना ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"टुदिप टेक्नॉलॉजीस" कंपनीत निवड झालेल्या शिवम कुमार यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment