अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावे यासाठी पंढरपुर सिंहगड महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत आहे. पंढरपूर सिंहगडच्या दर्जेदार व उत्कृष्ट शिक्षण प्रणाली मुळेच महाविद्यालयातील विद्यार्थी आज जगातील नामवंत कंपनीत नोकरी मिळवत आहे. चालू शैक्षणिक वर्षांतील कुमारी गौरी ताठे या विद्यार्थिनींची कॅम्पस मुलाखतीतून "ॲमेझॉन" या नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ श्याम कुलकर्णी यांनी दिली.
"ॲमेझॉन" ही कंपनी सतत सक्रीय स्टोअर आहे. ॲमेझॉन" हि कंपनी सद्या भारतामध्ये ऑनलाईन वस्तु विकत घेण्यासाठी खुप प्रसिद्ध प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी लॅपटॉप, मोबाईल सह अन्य वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या कुमारी गौरी ताठे या विद्यार्थिनीची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून गौरी ताठे हिला ४.३० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"ॲमेझॉन" कंपनीत निवड झालेल्या गौरी ताठे हिची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment