Breaking

Thursday, 25 November 2021

संपादक/ विजयकुमार परबत- सुरक्षारक्षकच काढत होता महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ; पुण्यातील आय.बी.गेस्टहाऊस मधील धक्कादायक प्रकार.


*सुरक्षारक्षकच काढत होता महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ; पुण्यातील आय.बी.(I.B.) गेस्ट हाऊसमधील धक्कादायक प्रकार*


पुण्यातील आय.बी.(I.B.) गेस्ट हाऊसमध्ये महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हि.डी.ओ. काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
बाथरुमच्या खिडकीतून हे फोटो आणि व्हि.डी.ओ. काढण्यात आले होते. 
परिचारिकेचे फोटो, व्हि.डी.ओ. काढल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण असं या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे. तक्रारदार महिला गेस्ट हाऊसमधील बाथरुममध्ये दुपारी आंघोळ करत असताना आरोपी सुरक्षारक्षक अशोक चव्हाण खिडकीबाहेर उभा राहून फोटो आणि व्हि.डी.ओ. काढत होता. 
हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरड सुरु केली. आरडाओरड ऐकल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी अशोक चव्हाणला पकडलं आणि नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

महिलेने याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कारवाई सुरु आहे.

No comments:

Post a Comment