Breaking

Saturday, 27 November 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - महिला वर्गाच्या बैठका घेऊन कायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी समुपदेश....सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम.


महिलावर्गाच्या बैठका घेऊन कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याबाबत समुपदेश...सो.ग्रा.पो. आ. श्रीमती तेजस्वी सातपुते.

सोलापूर:ऑपरेशन परिवर्तन व अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मळेगाव तांडा हे गाव दत्तक घेतले आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य गावठी दारू बनवली जात होते.
पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या पथकाने वेळोवेळी गावठी दारू इतर अवैध धंदे यावर छापे मारून कारवाई केली आहे. मुळेगाव तांडा येथे पोलिस अधीक्षकांनी युवक व महिलावर्गाच्या बैठका घेऊन कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याबाबत समुपदेशन केले. यामध्ये महिलांनी फॅशन डिझायनिंग व शिलाई मशीन च्या कामासाठी पसंती दाखवली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयातून मुळेगाव तांडा येथील तीस महिलेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला नुसता प्रशिक्षण घेणार नसून त्यांना प्लेसमेंट जॉब हि उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोणत्याही कामासाठी नारी शक्तीचा पाठिंबा आवश्यक आहे असे प्रतिपादन ही तेजस्वी तेजस्वी सातपुते यांनी यावेळी केले. उच्चशिक्षित असणाऱ्या महिलांनी अवैद्य असणारा दारू दारू व्यवसाय सोडून कायदेशीर व्यवसाय करणार असल्याचा मानसही यावेळी व्यक्त केला. गावात लागलेला दारू विक्रीचा टप्पा पुसून टाकण्यासाठी महिला पुढे सरसावल्याचे दिसत आहे.

याप्रसंगी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, निळकंठ जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment