Breaking

Wednesday, 3 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडच्या मेकॅनिकल विभागाचा कॅड कॅम सीएइ वर वेबिनार संपन्न.


*पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल विभागाचा कॅड कॅम सीएइ वर वेबिनार उत्साहात संपन्न*



एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार आयोजन आयोजित करण्यात आला होता. हा वेबिनार मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
  २8 व 31 ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या वेबिनार मध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभले. सद्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्याने महाविद्यालय बंद आहेत. या बंद कालावधीत विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी दिनांक २8 ऑक्टोबर २०२१ रोजी श्री. जगदीश नागरगोजे यांचे "करियर ऑपाॅरच्युटीज इन सिमेंन्स कॅड कॅम सॉफ्टवेअर" या विषयावर तर दिनांक 29 ऑक्टोबर २०२१ रोजी श्री. अजित काळे यांचे "कॉम्पुटर ऐडेड मनुफॅक्टअरिंग " या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले. यामध्ये इंडस्ट्री च्या मनुफॅक्टअरिंग सेक्टर मध्ये विद्यार्थ्यांना करियर च्या अनेक संधी उपलब्ध असल्याची माहिती श्री. अजित काळे यांनी ऑनलाईन सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांना दिली. तसेच 31 ऑक्टोबर 2021 ला "करियर ऑपाॅरच्युटीज इन  फइए " या विषयावर श्री.अपूर्व बापट यांनी मोलाचे मार्गदर्शन केले हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मेसा असोसिएशन यांच्यासह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. हृषिकेश देशपांडे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले. या वेबिनाराचे सुञसंचलन विद्यार्थी ओंकारेश्वर अडवळकर व अजिंक्य कोळवले यांनी तर सहभागी झालेल्या सर्वांचे आभार प्रा. हृषिकेश देशपांडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment