Breaking

Tuesday, 2 November 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - साखर कारखान्यांवरील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके...जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - साखर कारखान्यांवरील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके...जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती...संबंधित तहसीलदार पथकप्रमुख - याबाबत वृत्त असे की जिल्ह्यातील साखर कारखान्यातील ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबत चे आदेश त्यांनी सोमवारी जारी केले आहेत. 
                        जिल्ह्यातील गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे. यावेळी शेतकर्यांच्या ऊसाच्या वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथके नेमली आहेत.

भरारी पथकात संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे प्रमुख असतील.
वैधमापनकारक विभागाचे वजनमापे निरिक्षक ए.डी.गेडमे हे सदस्य सचिव तर सदस्य म्हणून साखर कारखाना हद्दीतील पोलिस ठाण्याचे अंमलदार, लेखापरिक्षक पी.आर.शिंदे ( पंढरपूर, सांगोला,माळशिरस), लेखापरिक्षक एन.डी.माडे ( बार्शी, माढा,करमाळा, मोहोळ), लेखापरिक्षक के.आर.धायफुले ( उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट) आणी शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. 

भरारी पथकाने स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. शेतकर्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे दिली जाते का याची खात्री करावी. वजनकाट्याबाबत गैरप्रकार होत असल्याचे किंवा पोलिस तक्रार असेल तर तपासणी करून कारवाई करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment