Breaking

Wednesday, 24 November 2021

मुंबई/ विजयकुमार परबत- परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन.


परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय घरासमोर जनशक्ती व एसटी कर्मचार्यांचे आंदोलन 



 एस.टी. चे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून आझाद मैदानावर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची कोणतीच दखल राज्य शासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे जनशक्ती संघटनेने आज रौद्ररूप धारण करत परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गोंधळ घालून काळी शाई फेकली. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थाना बाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


 याबाबत वृत्त असे की, तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे एस.टी.चे विलीनीकरण शासनामध्ये करा या मागणीसाठी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे गेल्या पंधरा दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जनशक्ती संघटनेने पाठिंबा दर्शविला. आंदोलन सुरू झाल्यानंतर 5 दिवस होऊनही राज्य सरकारमधील एकही मंत्री 'आझाद' कडे फिरकला नसल्याने जनशक्ती संघटनेने मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

 दरम्यान आज पुन्हा एकदा जनशक्ती संघटनेचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थाना लगत जनशक्ती च्या 3 टीम तैनात करण्यात आल्या. एखाद्या टीमला पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसरी टीम व त्यानंतर तिसरी टीम देखील सज्ज ठेवण्यात आली. गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून जनशक्ती चे बाबाराजे कोळेकर, अमोल चव्हाण, रोहन नाईकनवरे व इतर दोन कार्यकर्ते ना.परब यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि त्यांनी हातामध्ये आणलेल्या काळ्या शाईचे डबे निवासस्थानाच्या दिशेने भिरकावले व "एसटीचे विलीनीकरण झालेच पाहिजे, एकच छंद गोपीचंद, जनशक्ती संघटनेचा विजय असो, अतुल भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, लहुजी सेनेचा विजय असो " अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी लागलीच जनशक्ती च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे बराच वेळ कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झाली. दरम्यान अधिक पोलीस बळ असल्यामुळे कार्यकर्ते हतबल झाले आणि त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस चौकी मध्ये नेण्यात आले. 




... मंत्रालयाला घेराव घालणार

- गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. मात्र सरकार या बांधवांचा विचार करायला तयार नाही. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघड होऊ लागलेत. मात्र दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचा विचार करायला सरकारकडे वेळ नाही. ज्यांचा सरकारशी काही देणेघेणे नाही त्यांच्याशी बैठका लावल्या जात आहेत. हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव शासन आखत आहे. मात्र एसटी कर्मचारी माघारी हटणार नाही. तो आपला न्याय खेचूनच माघारी जाईल. शिवाय याबाबत आम्ही आणखीन दोन दिवस वाट पाहू अन्यथा मंत्रालयाला घेराव घालू असे आ.गोपीचंद पडळकर म्हणाले. 




 परिवहन मंत्र्यांची गाडी काळी करणार

- महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आझाद मैदानावर बसलेला आहे. यांच्याकडे शासनातील एकही मंत्री फिरकला नसल्याने गेल्या चार दिवसापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही शासनाचे डोळे उघडले नाहीत. त्यामुळे आज जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाला काळे डाग लावले आहेत. विलीनीकरण याबाबत लवकर निर्णय न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना अथवा निवेदन न देता परिवहन मंत्री अनिल परब यांची गाडी काळी करणार आहे असा इशारा अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे. 






 

No comments:

Post a Comment