Breaking

Sunday, 28 November 2021

नाशिक प्रतिनिधी/ संतोष देशपांडे- नाशिक येथे 183 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न.


आज नाशिक जिल्ह्यामधील नाकोडे येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील १८३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. तसंच शेतकरी, शेतमजुर, आदिवासी, युवक मेळाव्यात नागरिकांना  दादा यांनी संबोधित केलं. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री, माझे सहकारी, दिवंगत नेते ए. टी. उर्फ अर्जुन तुळशीराम पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. महाराष्ट्राच्या राजकारणात, आदिवासी बांधवांच्या विकासाचा स्वतंत्र ‘एटी’ पॅटर्न निर्माण केला. "किरकोळ, तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर आदिवासींना विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत विकास होईल" हे विचार ए. टी. पवार साहेबांनी अनेक वेळा, अनेक ठिकाणी बेधडकपणे मांडले. नुसते बेधडक विचार मांडून ते थांबले नाहीत, तर आपल्या समाजाचा, आपल्या लोकांचा, आपल्या भागाचा शाश्वत विकास करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केला. ज्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात विकासाचा ‘एटी’ पॅटर्न राबवला गेला, त्या ठिकाणी तब्बल १८३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सर्वांच्या साक्षीनं झालं आहे. पूर्वीच्या कळवण मतदारसंघाचे तब्बल पंचेचाळीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या दिवगंत ए. टी. पवार साहेबांना ही महाविकास आघाडी शासनाची द्विवर्षपूर्तीच्या निमित्तानं दिलेली कृतिशील वंदना आहे, असं मी समजतो. राज्यात सत्तेवर येऊन आज दोन वर्षे झाली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य, पाठिंबा दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या, राज्यातल्या तमाम बंध-भगिनी-मातांचे, तरुण मित्रांचे मनापासून आभार व्यक्त केले. राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी हे ‘महाविकास आघाडी’चं सरकार कायमच कटीबध्द राहिल, याची ग्वाही दिली. जनतेचं प्रेम #MVA सरकारबरोबर असचं कायम राहिल, याची मला खात्री आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

No comments:

Post a Comment