राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या २९ ऑक्टोबर रोजीच्या राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस) हटाव दिन आंदोलनात शिक्षक सहकार संघटना सोलापूर शाखा सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी सांगितले.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणारी नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना व सध्याची राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लाख सरकारी कर्मचारी उद्या शुक्रवारी एन.पी.एस हटाव दिन, ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला शिक्षक सहकार संघटनेने सक्रिय पाठिंबा दिला असून संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी कार्यालयासमोरील सकाळच्या सत्रातील १ तास ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महिला आघाडी राज्याध्यक्ष उमाताई घोरपडे, पुणे विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे, राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, राज्य संघटक विठ्ठल टेळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment