Breaking

Wednesday, 27 October 2021

माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे - ग्रामपंचायत भोसरेतील महात्मा जोतिबा फुले नगर येथे संविधान सभागृह बांधण्याची मागणी.


भोसरे ग्रामपंचायतीतील महात्मा जोतिबा फुले नगर येथे संविधान सभागृह बांधण्याची मागणी- याबाबत वृत्त असे की भोसरे येथील महात्मा जोतिबा फुले नगर येथे संविधान सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी अमोल हावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन क्र 442 नुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविणे व ते सर्वांना माहीत करण्यासाठी शालेय मुले मुली  यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ,अद्ययावत सुविधांसह संविधान सभागृह बांधण्याचा मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व  ग्रामपंचायत  स्तरावर हे सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्या अनुषंगानेच  भोसरे येथील महात्मा ज्योतीबा फुले नगर हा भागाची मागासवर्गीय म्हणून नोंद आहे. ग्रामपंचायत भोसरे मध्ये त्या नुसार  अनुसूचित जाती नवबौध्द  नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे.  या निकषानुसार महात्मा ज्योतीबा फुले नगर मधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी नागरिक आणी वंचित बहूजन आघाडी शाखा अध्यक्ष अमोल हावळे यांनी  उपविभागीय दंडाधिकार प्रांत कार्यालय कुर्डूवाडी, पंचायत समिती कुर्डूवाडी, आणी ग्रामपंचायत भोसरे यांच्या कडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment