Breaking

Wednesday, 27 October 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी /प्रसाद दप्तरदार - जनशक्ती संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी महेश मस्के यांची निवड.


जनशक्ती संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी महेश मस्के यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तसेच ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नासाठी आवाज उठवणारी संघटना म्हणून जनशक्ती संघटना नावारूपाला आली आहे. शेतकऱ्यांच्या तसेच इतर सामाजिक कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याने जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीचा समाज्यात वेगळा ठसा उमटवत ते सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत असल्याचे दिसून येत आहेत. आज खूपसे-पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी तालुक्यातील वाखरी येथिल महेश मस्के यांची निवड करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेच्या ध्येय धोरणानुसार समाज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामान्य नागरीकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या
यावेळी नूतन अध्यक्ष महेश मस्के यांनी तळागाळातील जनतेवरच शेतकऱ्यांच्या तसेच ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नासाठी आवाज उठवून संघटना बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे  पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे अमोल भाऊ चव्हाण अजिंक्य मोरे रोहन नाईकनवरे गणेश ढोबळे राजू कणसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment