Breaking

Wednesday, 27 October 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - टेंभूर्णी येथे आरोग्य कर्मचार्यांचा सन्मान.


*टेंभुर्णी येथे आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान*.
भारतामध्ये 100 कोटी लसीकरण पूर्ण झाले हे लसीकरण करण्यामध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे टेंभुर्णी  प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार घोळवे,डॉ. विक्रांत रेळेकर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने यशस्वीरित्या संपूर्ण भारतात 100 कोटी लसीचे उद्दिष्ट आतापर्यंत पूर्ण केले असून त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. कोरोना काळात कुटुंबातील व्यक्ती जवळ येत नसत परंतु डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वांची मनापासून काम करून कोरोना रुग्णांना सेवा दिली .

यावेळी भाजप ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू इंदलकर, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा माढा तालुका अध्यक्ष जमाल भाई  काजी. नाभिक संघटनेचे अध्यक्ष योगेश साळुंखे .अविनाश धोत्रे. महेश अवसलकर. मोहन पोळ .आकाश हिंगमिरे .अमोल गोरे. शंभुराजे पवार. पंकज काशीद .महेश धोत्रे .प्रशांत इंगळे. लखन माने .अजय कोकाटे. व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

No comments:

Post a Comment