*करमाळा* :- सर्वांचे परिचत राॅयल राज फोटो स्टुडिओ चे मालक राज चोपडे हे नेहमी प्रमाणेच आपल्या शाॅप मधले आपल्या काम करून घरी निघाले असता अचानक नजर घोलप नगर येथील शिवम मेस जवळ थंडीने काकडत बसलेल्या वयोवृध्द आजी कडे लक्ष गेले. एक क्षण स्तब्ध उभारून त्या आजी ची विचारपूस केली असता. तर आजी थंडीने काकडत रडत रडत म्हणाल्या या जगात माझ आपल अस कोणी नाही.अस ऐकल्या नंतर राज च्या डोळ्यात क्षणात अश्रू अनावर झाले. थोड्या वेळ भाष्य केल्या नंतर त्या आजी नी त्यांची हकीकत सांगितली. नंतर तु माझ्या साडी, चोळी, थंडीसाठी स्वेटर, शाल सकाळी आणून दे ही मागणी केली. शेजारी राहणाऱ्या काकूंनी चादर दिली. तेथून घरी आल्या नंतर राज ला रात्र भर झोप लागली नाही. परत सकाळी शाॅपवर जाताना आजी परत तिथेच दिसली. आजी चा तो निराधार चेहरा पाहून मन व्याकुळ झाले. मग फक्त आजीचा नाही तर करमाळा शहरातील अनेक निराधार व्यक्तींना मदत केली पाहीजे ही कल्पना राज यांच्या मनात आली. मग सुरू झाला एक हात मदतीचा... मग ही घडलेली सर्व हकीकत राज यांनी सर्व मित्र परिवार ला काॅल करून सांगीतल्या नंतर सर्व मित्रांनी जमेल त्या सरूपात मदत द्यायला सुरू केले. ही बाब करमाळा शहरतील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना सांगितल्या नंतर त्यांनी ही जमेल तशी मदत केली. तसेच खूप साऱ्या ज्ञात अज्ञात मित्रांनी मदत केली. जमलेल्या सर्व मदती च्या पैशातून आजींसाठी बोलल्या प्रमाणे साडी,चोळी, थंडीसाठी स्वेटर, शाल खरेदी करून दिले. ही सर्व मदत शहरातील काही मित्रांना सोबत घेऊन वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहर्यावरचे हास्य बघून राज व सर्व मित्रांच्या चेहर्यावर एक समाधान होते.
लेखन:- युवराज जगताप करमाळा.
*सदर ही पोस्ट नाव किंवा प्रसिद्धीसाठी नसून आपण या जगात जन्माला आलोय आहोत आपण या सृष्टीला या जगाला देण लागतो. एक निराधार अनाथ व्यक्तिस मदत मिळावी ह्या साठी आहे.*
*कोण निराधार व्यक्ति आढळून आल्यास व कोणाला गरज असल्यास जरूर संपर्क करावा.*
*संपर्क*
राज चोपडे मो.8080010288
युवराज जगताप मो.7376233783
तुषार बडेकर मो.7028808303
अमोल सुरवसे मो.7350110313
माऊली माने मो.9579554168
उत्कर्ष लांडगे मो.9503189875
रोहीत वाघमोडे मो.9322235583
नागेश ढाणे मो.9028505096
प्रेमसिंग परदेशी मो.9970665835


No comments:
Post a Comment