Breaking

Thursday, 28 October 2021

संपादक/ विजयकुमार परबत- गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आॅल आऊट आॅपरेशन.


*गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन*
police on duty beed sp

October 28, 2021
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलिस यंत्रणेला सक्त ताकीद दिली आहे.

यामध्ये रात्रीची पेट्रोलिंग,अचानक नाकाबंदी,ऑल आऊट ऑपरेशन,कोम्बिंग ऑपरेशन याबाबतच्या सविस्तर सूचना सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या होत्या.

यामध्ये दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ २३ वाजल्यापासून ते दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ चे सकाळचे ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व २८ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑल आउट ऑपरेशन करण्यात आले

या ऑपरेशन मध्ये गुन्हेगारांच्या वस्त्या तपासणे नाकाबंदी करणे अशा कारवाया करण्यात आल्या ज्यामध्ये ६१ अधिकारी व २६२ पोलीस अंमलदार यांनी कर्तव्य बजावले आहे.

या कारवाई दरम्यान ६६ गुन्हेगार वस्त्या तपासण्यात आले असून २५ हिस्ट्री शीटर चेक करण्यात आले आहे

ज्यामध्ये दोन फरार आरोपी पकडण्यात आले आहे तर १२८ समन्स व ७१ वॉरंट बजावण्यात आले आहे.

१३६९ वाहने तपासण्यात आली यामध्ये कारवाई करून एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे तसेच ५९ लॉज सुद्धा चेक करण्यात आलेले आहे.
ही सगळी कारवाई मा पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सामान्य जनतेतही पोलिसांबद्दल ची भावना बदलत चालली आहे आहे

No comments:

Post a Comment