"वादळी व्यक्तीमत्व...आबासाहेब उर्फ मंगल पाटील...
श्री.मंगल उर्फ शिवाजीराव चंद्रभान पाटील.
॰ मोडनिंबच्या पहिल्या सरपंचाचे सुपुत्र
॰ मोडनिंबचे माजी सरपंच
॰ श्री.सौ.उमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक
संस्थेचे माजी सचिव
॰ कुर्मदास सहकारी साखर कारखाना संचालक
॰ माढा तालुका काॅग्रेसचे माजी अध्यक्ष
अशा अनेक पदावर राहिलेले आबासाहेब.
श्री.उमा विद्यालयात शिक्षक असल्याने गेली २८
वर्ष माझा आबासाहेबांशी संपर्क आला.एक अतिशय उमदं व्यक्तिमत्व..मोडनिंबविषयी अतिशय तळमळ असलेली व्यक्ती आणि दिलेला सल्ला भले पाळायचा का नाही हा भाग
वेगळा पण ऐकुन घेण्याची क्षमता होती.कधी
टीकेचे प्रसंगही झेलताना थोडं चुकलेच हा भाव
असायचा पण त्यात प्रांजळपणा होता.
अत्यंत उत्सवप्रिय व्यक्ती म्हणुन नेहमी आबासाहेब लक्षात राहतील.कार्यक्रमात प्रत्येक
व्यक्तीचा सहभाग घेण्याकडे कटाक्ष असायचा.
मग ती व्यक्ती संस्था सभासद असो की पालक
असो.सगळ्यांना बोलावुन सन्मान दिला जायचा
उमा डे चा कार्यक्रम म्हणजे आबासाहेबांच्या
दृष्टीने मोठा कार्यक्रम..ठरवायचे सर्वांच्या
विचाराने पण कसा कार्यक्रम करायचा,कुणाला
बोलावयाचे याचं पक्क नियोजन असायचे,
आणि मग सगळ्या गोष्टी आबासाहेबांच्या मनासारख्या घडवाव्या लागायच्या..हेही आमच्या अंगवळणी पडलं होतं पण कार्यक्रम
म्हणला की अंगात उत्साह संचरायचा..मग
कै.तात्यांची जयंती,पुण्यतिथी असो..तात्याबद्दल
कृतज्ञ भाव असायचा.कै.तात्यांंनी बोट धरुन मला शाळेवर आणलंय.त्यांना विसरुन कसे चालेल.हा कृतज्ञ भाव अखेरपर्यंत होता.
श्री.उमा विद्यालय हा आबासाहेबांचा जिव्हाळ्याचा विषय..मी ज्या ज्या वेळी सचिव
झालो.त्यावेळी नविन शाखा चालु केली हे खुप
अभिमानाने सांगायचे.परवाच्या निवडणुकीत
पराभव झाल्यावरही दुसर्या दिवशी येऊन
नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार करण्याचे
औदार्य आबासाहेबांनी दाखवले..पराभवाचे शल्य होते,पण पराभवही स्वीकारला होता..
एक राजकारणी म्हणुन कै.प्रभाकरपंत साठेंचे
वारसदार राहिले.एक निष्कलंक चारित्रवान नेता
म्हणुन नेहमीच आदरस्थानी राहिले.कुवत व
जनसंपर्क असुनही राजकारण वरच्या शिडीवर
चढता आलं नाही.एक संधी आली होती पण
सात सहकार्यांच्या दुर्दैवी अपघाताने तीही
काळाने हिरावुन नेली.या घटनेने हळवे झालेले
व कै.प्रभाकर मालक,इंगळे साहेब,यावलकर,
मनोहर पाटील व विशेष म्हणजे खास मित्र
असलेल्या विष्णुपंत पवारांच्या जाण्याने खचलेले आबासाहेब आम्ही पाहिले.तसे राजकारणात आबासाहेब हे नेहमीच काॅग्रेसच्या
विचाराचे राहिलेले.माढ्याचे माजी आ.धनाजी
साठेंचे खंदे समर्थक.घरगुती किंवा सामाजिक
जीवनातील कार्यक्रम असो मा.धनाजीतात्या
पाहिजेत हा आग्रह असायचा.खरंतर धनाजीतात्या हीच त्यांची पार्टी होती.त्यामुळे धनाजीतात्या काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असताना
आबासाहेब सहा वर्षे माढा तालुका काॅग्रेसचे
अध्यक्ष राहिले होते.सत्ताधारी असुनसुध्दा
सत्ता राबवणे किंवा तीचा उपभोग घेणे हे कधी
साधले नाही,फक्त एक कार्यकर्ता म्हणुन काम करणे हेच ध्येय अखेरपर्यंत राहिले.खरंतर मोडनिंबच्या सामाजिक व राजकीय जीवनात
निष्कलंक चारित्र्याचा भला माणुस म्हणुन नक्कीच नोंद होईल.पदाचा कधीच बडेजाव न
करता सर्वसामान्यांना कट्ट्यावरही भेटणारा
नेता म्हणजे आबासाहेब..
कार्यंक्रम कोणताही असो भाषण करायला
नको नको म्हणत उभे राहायचे आणि अगदी
कसलेल्या वक्त्याप्रमाणे भाषणही द्यायचे,टोमणे मारायचे,माफ करा स्पष्ट बोलतो असं म्हणुन
पुन्हा सावरुन घेतलेलं असायचं...
परवाच्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत म्हणाले,सर
आता थांबतो...माझ्या समक्ष बालाजीला माझा
वाॅर्ड सुपुर्द करतो..माणसाला खरंच आपल्या
जाण्याची चाहुल लागते का?आणि त्या निवडणीत समोर कडवं आव्हान असतानाही
आबासाहेबांनी वाॅर्ड राखला.
जयवन्त समुद्र सर,मोडनिंब.


No comments:
Post a Comment