Breaking

Wednesday, 27 October 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - सिंहगड मध्ये बिगडाटा आणी अनॅलिसिस या विषयावर वेबिनार संपन्न.


*पंढरपूर सिंहगड मध्ये "बिग डाटा आणि अनॅलिसिस" या विषयावर वेबिनार संपन्न*

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात  "बिग डाटा आणि अनॅलिसिस" या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित केला होता हा वेबिनार मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुगल मिट च्या माध्यमातून  "बिग डाटा आणि अनॅलिसिस" या विषयावर डाॅ. मृदुल दिक्षित यांचे वेबिनार आयोजित केले होते. हे वेबिनार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये डॉ. मृदुल दिक्षित यांनी उपयुक्त माहिती दिली. दरम्यान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अंजली पिसे सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अभिषेक बडवे यांनी केले तर आभार ऐश्वर्या बोकसे यांनी मानले.

No comments:

Post a Comment