Breaking

Wednesday, 27 October 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - कोरोना कालावधीत सिंहगड प्लेसमेंट बरोबरच इंटरशिपमध्येही अव्वल.


*कोरोना कालावधीत पंढरपूर सिंहगड प्लेसमेंट बरोबरच इंटरंशिप मध्येही अव्वल.* 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांकडून इंटरंशिपसाठी ऑफर देण्यात आली आहे. इंटरंशिप क्षेत्रांमध्ये पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय अव्वल असणारा प्लँटफार्मस  इंर्टशाला, टुलिप, जुगाड फंडा, ए.आय .सी. टी.ई. तसेच भारत सरकारचे विविध प्लॅटफॉर्म या सर्व प्लॅटफॉर्मवर महाविद्यालयात द्वितीय आणि तृतीय वर्षांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इंटरंशिप करण्याची संधी मिळाली आहे. कोरोना कालावधीत इंटरंशिप च्या संधी उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मध्ये नक्की फायदा होणार आहे. शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना प्लेसमेंट मध्ये इंटरंशिप चे प्रश्न विचारले जाते म्हणून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने प्लेसमेंट दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ची संधी दिली  आहे.
यातील काही कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना ०३ ते १० हजार प्रति महिना असा मोबदला मिळाला आहे  तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्स बेस्ड मोबदला मिळणार आहे. या इनटरशिप मुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत प्लेसमेंट द्वारे निवडले जात आहेत.
   इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल करिअर संदर्भात पुरेशा प्रमाणामध्ये माहिती व ज्ञान अवगत होते. त्याचबरोबर इंटरंशिप करणारे विद्यार्थी प्रोफेशनल करिअर मध्ये यशस्वी होतात. अशा विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स लेव्हल तसेच लाइफ स्किल्स यासंदर्भातील धडे मिळत असतात. त्यातून कंपन्या करिता लागणारे कॉलिटीचे इंजिनिअर तयार होतात.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आवश्यक ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असुन कठोर परिश्रम घेत असते. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने आज अखेर पर्यंत १७० हून अधिक इनटरशिप आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
 हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, महाविद्यालयातील इंटरंशिप को-ऑर्डिनेटर प्रा. अभिजित सवासे, सर्व विभागाचे अधिष्ठाता सह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले आहे. या मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment