Breaking

Wednesday, 27 October 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडच्या अणुविद्युत व दूरसंचार विभागात आॅनलाईन पालक मेळावा संपन्न.


*पंढरपूर सिंहगडच्या अणुविदयुत व दुरसंचार विभागात ऑनलाईन पालक मेळावा संपन्न*

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील अणुविदयुत व दुरसंचार विभागात ऑनलाईन पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   अणुविदयुत व दुरसंचार विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पालक मेळावा आयोजित केला होता.   यादरम्यान डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विभागातील सविस्तर माहिती ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिली. सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय ऑनलाइन गुगल मिटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्तेविषयी विचार मंथन करण्यासाठी ऑनलाईन पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल व विविध प्रश्नांवर सर्वागीण विकासाबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली पालकांनी विचारलेल्या प्रश्नाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उत्तरे  देऊन विविध शंकांचे निरसन केले. या पालक मेळाव्यात ४० हून अधिक पालकांनी सहभाग नोंदवला.
 या पालक मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment