Breaking

Monday, 6 September 2021

माण-खटाव तालुका प्रतिनिधी/ नितिन सावंत- मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला; आठ मेंढरं ठार तर पाच बेपत्ता, आटपाडी तालुक्यातील करगणे ( तडवळे ) येथील घटना.




*मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला आठ मेंढरं ठार पाच  बेपत्ता* 
आटपाडी तालुक्यातील करगणी (तडवळे) येथील घटना..
 
    याबाबत याबाबत सविस्तर माहिती  *संतोष गणपती खांडेकर मुक्काम पोस्ट नागराळे तालुका पलुस जिल्हा सांगली शंकर कृष्णात बंडगर मुक्काम पोस्ट शेंडूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर नवनाथ मुरारी कोळेकर मल्लेश नवनाथ पडवळे राहणार आडी तालुका निपाणी सिद्राम सुरेश पडवळे राहणार आडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव* हे सर्व मेंढपाळ स्थलांतर करीत करीत  या सर्व मेंढपाळांचा तळ *दत्तात्रय नामदेव शेंडे राहणार तडवळे यांच्या  येथे असणारे यांच्या करगणी ता.आटपाडी जि.सांगली  गोसावी वस्तीजवळील हुंबरवाडा* नावाच्या मळ्यातील शेतात खतासाठी मेंढरांचा तळ होता *रविवार दि.५/९/२०२१ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक  मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला झाला* *मेंढराच्या संरक्षणासाठी लावलेली (जाळे)वागर लांडग्यांनी तोडून कळपात प्रवेश केला आणि पाच मेंढरांना मोठी व तीन लहान पिलांना ठार केले व पाच मेंढरं बेपत्ता आहेत मेंढरांच्या ओरडण्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले.*  पाहतात तर काही *लांडग्यांनी बकऱ्यांना  तोंडात धरून घेऊन पळून गेले. दोन बकरी पुर्ण खाऊन फस्त केली आहेत* . या *हल्ल्यात मेंढपाळांची सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.* हल्ल्याची *घटना मेंढपाळांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय वाघमोडे यांना व यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर शेंडूर शाखाध्यक्ष राजाराम हजारे यांनीही कळवली* तसेच *संजय वाघमोडे साहेब यांनी मेंढपाळांना धीर देऊन आटपाडी तळवडे वनरक्षक अंबिका तळे  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण यांना कळवून  नुकसानभरपाईसाठी रीतसर पंचनामा करण्याची विनती केली* 
 लगेचच 
 *पांडुरंग बाळू बालंडे वनपाल आटपाडी आटपाडी अंबिका भगवान तळे वनरक्षक आटपाडी सुखदेव जगन्नाथ माळी वन मजूर जितेंद्र शिवाजी गिड्डे वनमजूर डॉक्टर लक्ष्मण गाढवे पशुवैद्यकीय अधिकारी निंबवडे डॉक्टर अविनाश चव्हाण पशुवैद्यकीय अधिकारी करगणी आटपाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रितसर पंचनामा केला* . पशुवैद्यकीय अधिकारी व वनकर्मचारी  लक्ष्मण सरगर अध्यक्ष सांगली जिल्हा रासप राम कोळेकर, सरचिटणीस यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा,तात्काळ घटनास्थळी हजर राहिले त्याबद्दल मेंढपाळ यांनी यशवंत क्रांती संघटना पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment