Breaking

Saturday, 18 September 2021

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके - मुंब्य्रात नियम मोडणार्या वाहन चालकांवर कडक कारवाई.


मुंब्र्यात नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर  कारवाई

 राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकांसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्या मुंब्र्यातील वाहन चालकांवर वाहतूक शाखा तसेच शहर पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही कारवाई केली. या कारवाईमध्ये विना अनुज्ञप्ती (लायसन्स) वाहन चालविताना आढळून आलेल्या, तसेच कागदपत्रे जवळ न बाळगता वाहने चालविणाऱ्या, त्याचप्रमाणे विनाहेल्मेट, बॅच, तसेच रिक्षा चालविताना, विनागणवेश रिक्षा चालविताना आढळून आलेल्या आणि वाहने चालविताना कोरोनाच्या नियमांनुसार मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण १५० वाहन चालकांवर ६७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी  दिली.

No comments:

Post a Comment