*शिक्षण परिषद केंद्र मोडनिंब*
आज दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी केंद्र मोडनिंब येथील सर्व शाळांची ऑनलाईन पद्धतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री केदार सर* यांनी केले.
तद्नंतर जि. प.शाळा नं.1 च्या *श्रीम वृषाली भोसले मॅडम* यांनी NAS (national achievement survey) अंतर्गत इयत्ता तिसरी चे भाषा आणि परिसर अभ्यास या विषयांचे ppt च्या साहाय्याने सखोल मार्गदर्शन केले आणि गणित विषयाचे मार्गदर्शन मोडनिंब मुलींच्या शाळेच्या *श्रीम उर्मिला टिळेकर मॅडम* यांनी केले.
*माढा तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष ,हरहुन्नरी उपक्रम शील गटशिक्षणाधिकारी श्री मारुती फडके साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच सोलांकरवाडी, बावी,बैरागवाडीशाळेत चाललेल्या उपक्रमांची स्तुती केली आणि अभिनंदन ही केले सर्व शाळांना पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या तसेच काही मार्गदर्शक सूचना केल्या आणि मोडनिंब केंद्र सर्व उपक्रमात अग्रेसर आहे अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.*
ऑनलाईन आणि ऑफ लाईन ठळक व वेचक उपक्रम मार्गदर्शन केंद्रातील उपक्रमशील शिक्षकांनी केले .
सोलांकरवाडी शाळेचे उपक्रम शील शिक्षक *श्री परमेश्वर सुरवसे* सरांनी माझा अभ्यासाचा गाव हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला आणि त्याची फलश्रुती काय अपेक्षित आहे हे ही सरांनी उत्तम प्रकारे सांगितले.
तद्नंतर जि .प.शाळा बावी येथील *श्री शरद पवार* सर यांनीमाझा वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम याबद्दल शिक्षण परिषदेला संबोधित केले .
यानंतर *श्रीम अर्चना मारकड* मॅडम राजगे ताकतोडे वस्ती यांनी अध्यापनातील उपक्रमशीलता याविषयी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले.
सुर्वे वस्ती शाळा मोडनिंब येथील *श्रीम वीर मॅडम* यांनी माझा वर्ग आणि मी याबद्दल स्वतः चे अनुभव अगदी सहज आणि मोजक्या शब्दात मांडले.
संगणबसवेश्वर प्रशालेचे *श्री शेखर सुर्वे* सर यांनी खूप विश्लेषक माहिती अध्यापनातील वैविध्यता याबद्दल सांगितली.
शाळा व्यवस्थापन समिती बैठकांचे प्रभावी नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केंद्राचे उपक्रमशील केंद्रप्रमुख *श्री केदार सर* यांनी केले.
पंचायत समिती कुर्डुवाडी ता-माढा येथील *श्रीम दीपाली माळी* ह्या बाह्यनिरीक्षक म्हणून शिक्षण परिषदेस हजर होत्या त्यांनीही शिक्षण परिषदेला संबोधित केले. शिक्षण परिषदेचा समारोप /आभारप्रदर्शन *श्रीम सारिका घाडगे* मॅडम यांनी केले
कार्यक्रम सूत्र संचलन शाळा नं 1 च्या *श्रीम जयश्री शिंदे मॅडम* यांनी केले.
शिक्षण परिषदेस तांत्रिक साहाय्य सोलांकरवाडी शाळेचे *श्री परमेश्वर सुरवसे सर* यांचे लाभले.
*शब्दांकन* ----
*श्रीम जयश्री शिंदे जि प शाळा नं 1 मोडनिंब ता-माढा जि-सोलापूर*


No comments:
Post a Comment