Breaking

Friday, 27 August 2021

संपादक/ विजयकुमार परबत- दोन लाख वीस हजाराची लाच घेताना शाखा अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ.


*२ लाख २० हजाराची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ*

पाटबंधारे विभागाच्या  माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख २० हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 
मुरलीधर पाटील असं लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव आहे. 
तब्बल २ लाख २० हजार रुपयाची लाच प्रकरणी शाखा अभियंता ए.सी.बी.(A.C.B.) जाळ्यात सापडल्याने पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीपथकाच्या नुसार, पाटबंधारे विभागाच्या नवापूर  तालुक्यातील रंगवली प्रकल्पाचे संरक्षक भिंत आणि पुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या संबंधित व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे.
यावरून धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तर, या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराने बिल काढण्यासाठीची कार्यवाही केली होती.
यासाठी त्यांनी शाखा अभियंता मुरलीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता.
या कामात सहकार्य करण्याचे आश्वासन देत शाखा अभियंता पाटील यांनी तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख २० हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती.

दरम्यान, यावरून तक्रारदारांनी धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांना संपर्क करून तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आणि मनजीतसिंग चव्हाण यांनी याठिकाणी सापळा रचला.
या दरम्यान, लाचेची रक्कम स्वीकारताना मुरलीधर पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

No comments:

Post a Comment