Breaking

Monday, 16 August 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - गंगाधर चिपळूणकर यांची डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास भेट.


*गंगाधर चिपळूणकर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास भेट*
*श्रीपूर*

श्री चंद्रशेखर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले व सध्या अमेरिकेत पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर मायदेशी परतलेले गंगाधर चिपळूणकर यांनी आज श्रीपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास भेट दिली चिपळूणकर हे दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत केंद्रात त्यावेळी सर्व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत संगणक क्षेत्रात तज्ज्ञ आहेत पुणे येथे ते स्थाईक झाले आहेत त्यांचे वडील केशव चिपळूणकर हे दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडीकेट लि कंपनी श्रीपूर येथे बायलर अटेंडेंट म्हणून नोकरीला होते गंगाधर चिपळूणकर यांनी अमेरिकेतील माहिती तेथील परंपरा संस्कृती तेथील व्यवस्थापन अमेरिकन लोक जिवन यांच्यावर सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांचे समवेत भाऊसाहेब कुलकर्णी होते वाचनालयात त्यांचे स्वागत करण्यात आले भरत बनसोडे महादेव आठवले बी टी शिवशरण गौतम आठवले राजू शेंडगे जयंत भोसले इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment